उ.प्रदेशात प्रियंका गांधींना काँग्रेसचा चेहरा बनवण्यासाठी राहुल गांधींचा होता विरोध- प्रशांत किशोर

rahul-kishor

उत्तर प्रदेश : राजकीय रणनीतीगार प्रशांत किशोर यांनी ‘द लॅलान्टॉप’शी भाष्य करतांना उत्तर प्रदेशात प्रियंका गांधींना काँग्रेसचा चेहरा बनवण्यासाठी राहुल गांधींचा विरोध असल्याचा खुलासा केला आहे.

उत्तर प्रदेश निवडणुकांची आठवण करून देताना प्रशांत म्हणाले की,’अगोदर मी या ऑफरबद्दल थोडा गोंधळलो होतो. साहजिकच मी माझ्या सहकाऱ्यांचा सल्ला घेतला असावा. ते म्हणाले होते की जर उत्तर प्रदेश जिंकले तर यापेक्षा मोठे काहीही असू शकत नाही. उत्तर प्रदेशमध्ये मी सुमारे तीन महिने काम केले आणि काँग्रेससाठी एक योजना बनवली. मात्र, सुरुवातीला राहुल गांधी काही गोष्टींसाठी तयार नव्हते.’

दरम्यान, पुढे बोलतांना ते म्हणाले की,’जेव्हा मी संपूर्ण योजना काँग्रेससमोर ठेवली तेव्हा त्यांच्या मते काही गोष्टी आक्षेपार्ह होत्या. जसे प्रियांका गांधींना पक्षाचा चेहरा बनवणे आणि सोनिया गांधींकडून संपूर्ण मोहीम सुरू करणे. तीन महिने चर्चा झाली आणि जूनमध्ये त्यांनी माझे ऐकले. मग पुन्हा प्रचाराला सुरुवात झाली आणि याचा पुरावा म्हणजे जमिनीवर काँग्रेसची चांगली हवा होती. पण समाजवादी पक्षाशी युती ही सर्वात घातक चाल असल्याचे सिद्ध झाले’ असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या