fbpx

आपल्या जन्मावेळी उपस्थित असणाऱ्या नर्सची राहुल गांधींनी घेतली भेट

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी शनिवारी केरळच्या वायनाडमध्ये गेले. आज त्यांनी कोझीकोडेमध्ये रोड शो केला आणि सभेला संबोधित केले. विशेष म्हणजे त्यांनी या दौऱ्यात त्यांच्या जन्मावेळी उपस्थित असणाऱ्या नर्सची भेट घेतली. राजम्मा ववाथिल (वय ७२) असे त्या नर्सचे नाव आहे. या भेटीने राजम्मा आनंदून गेल्या होत्या. राहुल गांधी यांनी लोकसभेसाठी वायनाडमधून लढण्याचा निर्णय घेतल्यावर राजम्मा यांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

राहुल गांधींनी वायनाडमधून अर्ज दाखल केल्यावर त्यांच्या नागरिकत्त्वावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. १९ जून १९७० रोजी राहुल गांधी यांचा दिल्लीतील होली या त्या फॅमिली हॉस्पिटलमध्ये जन्म झाला. त्या नागरिकतेवर प्रश्न उठवणे चुकीचे आहे, असे राजम्मा यांनी म्हटले होते व त्यांची पाठराखण केली होती. दरम्यान, राहुल गांधींनी वायनाड लोकसभा मतदारसंघातून ४.३१ लाख मतांच्या फरकाने विजय मिळविला. परंतु, त्यांना स्वतःच्या अमेठी मतदारसंघातून भाजपाच्या स्मृती इराणींकडून पराभव स्वीकारावा लागला.