आजपासून कॉंग्रेसमध्ये राहुल’पर्वाची’ सुरुवात

rahul gandhi cap

टीम महाराष्ट्र देशा: काँग्रेस पक्षात आता काही तासांनंतर राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. मोठ्या कालावधीपासून काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहणारे राहुल गांधी शनिवारी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सुत्रे स्विकारणार आहेत. त्यासाठी दिल्लीतील २४ अकबर रोडवरील पक्षाच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी सुरु आहे. काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते उत्साहात दिसत आहेत

Loading...

काँग्रेस मुख्यालयात राज्याभिषेक

दिल्लीतील 24 अकबर रोडवरील AICC म्हणजेच काँग्रेस मुख्यालयात आज राहुल गांधी यांच्या राज्याभिषेकाचा कार्यक्रम होणार आहे. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. राहुल यांच्या राज्याभिषेकाचा कार्यक्रम भव्य बनवण्यासाठी देशभरातील काँग्रेस पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी राहुल गांधी यांच्यावर सोपवण्याचा निर्णय घेतला होता. राहुल गांधींकडे पक्षाची धुरा सोपवल्यानंतर सोनिया गांधी यांनी निवृत्तीचे संकेत दिले होते. मात्र काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवरून सांगितलं की, ‘सोनिया गांधी केवळ काँग्रेस अध्यक्षपदावरून पायउतार होत आहेत. सक्रिय राजकारणात त्यांचे योगदान कायम राहील व काँग्रेसला त्यांचे मार्गदर्शन राहीलच.’ सोनिया गांधी सलग १९ वर्ष काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या.

राहुल गांधी आज सकाळी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचं प्रमाणपत्र स्वीकारतील. सोनिया गांधी आणि डॉ. मनमोहन सिंह यांच्यासह पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राहुल गांधी पक्षाला नव्या रुपात पुढे नेण्यासाठी रुपरेषा मांडतील.

काँग्रसचे 18वे, गांधी घराण्यातील सहावे

राहुल गांधी हे काँग्रेसचे 18वे अध्यक्ष ठरले आहेत. तर गांधी घराण्यातील सहावे व्यक्ती आहेत. याआधी मोतीलाल नेहरु, पंडीत जवाहरलाल नेहरु एकदा, इंदिरा गांधी दोन वेळा, राजीव गांधी एक वेळा, सोनिया गांधी एक वेळा काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. सोनिया गांधी सलग 19 वर्ष काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या, आता ही जबाबदारी राहुल गांधी यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

4 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...