fbpx

हर चीज में लीक है , चौकीदार वीक है, पेपरफुटीवरून नरेंद्र मोदींना केले लक्ष

Rahul-Gandhi-Narendra-Modi-

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. देशात कितने लीक? डेटा लीक, आधार लीक , SSC Exam लीक , Election Date लीक , CBSE पेपर्स लीक हर चीज में लीक है , चौकीदार वीक है, अशाप्रकारे राहुल गांधीनी नरेंद्र मोदींना टोमणे मारले आहेत.

सीबीएसई बोर्डाचा दहावीचा गणित आणि बारावीचा अर्थशास्त्र विषयाचा पेपर फुटल्याची बाब समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. शेवटी या दोन्ही विषयांच्या परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय बोर्डाला घ्यावा लागला. तसेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे.

पेपर पुन्हा द्यावा लागणार म्हणून विद्यार्थांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. तर राजकीय नेत्यांनी सरकारला दोष दिला आहे.

3 Comments

Click here to post a comment