…तेव्हा माझे हात थरथरत होते-सोनिया गांधी

नवी दिल्ली: “20 वर्षांपूर्वी काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा हाती घेताना माझे हात थरथरत होते मी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारली त्यावेळी आमच्याकडे फक्त 3 राज्य होती, केंद्राची सत्ता दूर होती. पण नंतर आम्ही डझनपेक्षा जास्त राज्यात सत्ता मिळवली”. काँगेसच्या मावळत्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपले अध्यक्षपद सोडताना केलेल्या भाषणात काँग्रेसच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकला. यावेळी त्या इंदिरा आणि राजीव गांधींच्या आठवणीने भावुक देखील झाल्या.

आव्हानं खूप आहेत, पण आम्ही घाबरणारे नाहीत, झुकणारे नाहीत राहुल माझा मुलगा, त्याचं कौतुक करणार नाही, त्याने लहानपणापासूनच हिंसा पाहिली आहे, त्यामुळे कणखर झाला आहे. काँग्रसे अध्यक्षपदाची सूत्रं राहुल गांधींकडे सोपवल्यानंतर राहुल गांधी याचं कौतुक करायला सुद्धा सोनिया गांधी विसरल्या नाही.