fbpx

भाजप आग लावते तर कॉंग्रेस विझवते : राहुल गांधी

टीम महाराष्ट्र देशा: आम्ही सत्तेत असताना देशाला २१ व्या शतकात घेवून आलो, मात्र सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला मध्य युगात घेवून जाण्याच काम करत आहेत. भाजप देशामध्ये आग लावण्याचे काम करते तर कॉंग्रेस विझवण्याचे म्हणत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे. आज राहुल गांधी यांनी कॉंग्रेसच्या अध्यक्षपद्ची सूत्रे स्वीकारली यावेळी ते बोलत होते.

कॉंग्रेस कार्यकर्त्यांना विश्वास देतो कि तुमचं आवाज देशात ऐकला जाईल. तसेच कॉंग्रेसला पुन्हा एकदा युवकांची आणि प्रभावशाली पार्टी बनवण्याचे काम करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

…तेव्हा माझे हात थरथरत होते-सोनिया गांधी

20 वर्षांपूर्वी काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा हाती घेताना माझे हात थरथरत होते मी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारली त्यावेळी आमच्याकडे फक्त 3 राज्य होती, केंद्राची सत्ता दूर होती. पण नंतर आम्ही डझनपेक्षा जास्त राज्यात सत्ता मिळवली”. काँगेसच्या मावळत्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपले अध्यक्षपद सोडताना केलेल्या भाषणात काँग्रेसच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकला. यावेळी त्या इंदिरा आणि राजीव गांधींच्या आठवणीने भावुक देखील झाल्या.