पंतप्रधानानां मिठी मारणाऱ्या नीरव मोदीनी देशाला कसे लुटायचे ते शिकवले- राहुल गांधी

पंजाब नॅशनल बँकेमध्ये झालेल्या ११ हजार कोटींच्या घोटाळयामुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. या घोटाळ्याचा आरोप असणारा नीरव मोदी हा प्रसिद्ध हिरे व्यापारी आहे. घोटाळा उघडकीस आल्यानंतर नीरव मोदीने देखील विजय मल्ल्याप्रमाणे देशातून पलायन केले आहे. यानंतर आता नीरव मोदी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दावोसमधील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळात सहभागी असल्याच उघड झाले आहे. यावरूनच कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरीवंद केजरीवाल यांनी ट्विटरवरून सरकारवर निशाना साधला आहे.

निरव मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधानांना मिठी मारली आणि नंतर त्यांच्यासोबत दावोसला दिसले. आणि पुढे पंजाब बँकेत ११ हजार ३०० कोटींचा घोटाळा करुन मल्ल्यासारखाच पळून गेला आणि सरकार फक्त बघत बसल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटकरत ‘सरकारच्या मदतीशिवाय विजय मल्ल्या किंवा नीरव मोदी देश सोडून जाणे शक्य आहे का?’ असा प्रश्न विचारला आहे.

तर माकपचे नेते सीताराम येचुरी यांनी दावोसमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत असणारा नीरव मोदीचा फोटो पोस्ट करत टीका केली आहे.