राहुल गांधींनी राफेल प्रकरणी माफी मागावी, भाजप खासदारांचा संसदेत गदारोळ

rahul-gandhi

टीम महाराष्ट्र देशा – सुप्रीम कोर्टाने राफेल करारावरुन मोदी सरकारला दिलासा दिल्यानंतर आज (शुक्रवार) संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मोठा गदारोळ झाला. राफेल प्रकरणी आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी भाजपा खासदारांनी लोकसभेत केली. तर दुसरीकडे राज्यसभेतही मोठा भाजपा खासदारांनी मोठा गोंधळ घातला, त्यामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

राफेल खरेदी प्रकरणात कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार झाला नसल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. मोदी सरकारने फ्रान्सकडून 36 राफेल विमाने खरेदी केली होती. या करारातील ऑफसेट हक्क रिलायन्स डिफेन्सला देण्याच्या निर्णयातही आक्षेपार्ह काहीच सापडले नसल्याचेही कोर्टाने स्पष्ट केले.

राफेल करारात घोटाळा झाल्याचं सांगून राहुल गांधींनी देशाची दिशाभूल केली आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर त्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी संसदीय कार्य मंत्री थावर चंद गहलोत यांनी केली. त्यानंतर सत्ताधारी खासदारांनी घोषणा द्यायला सुरुवात केल्यानं सभागृहाचं लोकसभेचं कामकाज तहकूब करावं लागलं.