राहुल गांधींनी अयोध्येतल्या राम मंदिरातही जावं – संजय राऊत

sanjay-raut

टीम महाराष्ट्र देशा: राहुल गांधी ज्याप्रमाणे सोमनाथच्या मंदिरात गेले, त्याचप्रमाणे त्यांनी अयोध्येतल्या राम मंदिरातही जावं, अस आव्हान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधी यांना केल आहे.

सध्या गुजरात मध्ये जोरदार प्रचार सुरु आहे. या प्रचारादरम्यान राहुल गांधींनी सोमनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते, यावरून मोठे वादंग देखील झाले होते. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी राहुल गांधीना अयोध्येत जावून राम मंदिरात पूजा करावी अस करण्याचं आव्हान केलंय. राहुल गांधी मतांसाठी गुजरातच्या मंदिरात जातात तर त्यांनी अयोध्येच्या मंदिरातही जावं असं संजय राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, राम मंदिर वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. फेब्रुवारीत नियमित सुनावणी ही सुरू होणार आहे. त्यामुळे रामजन्मभूमीचा मुद्दा पुन्हा पेटण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. एकीकडे सामना मधून गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधींवर स्तुतीसुमनं उधळली जात आहेत पण आज अचानक संजय राऊत यांनी राहुल गांधींना आव्हान दिल आहे. त्यामुळे आता राहुल गांधी खरंच राम मंदिराच्या राजकारणात उडी घेतात की नाही हे पाहण महत्वाच असणार आहे.