राहुल गांधी यांनी स्वतःवर आणि देशावर उपकार म्हणून राजकारण सोडून द्यावे

rahul-gandhi

वेबटीम : राहुल गांधी यांनी स्वतःवर आणि देशावर उपकार म्हणून राजकारण सोडून दुसरा पेशा स्वीकारावा असा खोचक सल्ला प्रख्यात इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी दिला आहे . ‘एनडीटीव्ही’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गुहा यांनी हा सल्ला दिला आहे

रामचंद्र गुहा हे प्रख्यात इतिहासकार म्हणून ज्याप्रमाणे प्रसिद्ध आहेत त्याचप्रमाणे आपल्या रोखठोक बोलण्याच्या शैलीमुळे देखील नेहमीच चर्चेत असतात.नुकतीच त्यांनी लिहलेल्या ‘इंडिया आफ्टर गांधी’ या पुस्तकाला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत.या पार्श्वभूमीवर एनडीटीव्ही’ या वृत्तवाहिनीने त्यांची एक मुलाखत घेतली .या मुलाखतीत त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीच विश्लेषण केलं.

रामचंद्र गुहा यांनी घेतलेला देशातील राजकारणाचा सद्यस्थितीचा आढावा

सध्याच्या घडीला विरोधकांकडे मोदींना पर्याय ठरू शकेल, असा एकही चेहरा नाही. मात्र, काँग्रेसने नितीश कुमारांकडे नेतृत्त्व द्यायचे ठरवल्यास मोदींच्या झंझावात रोखता येणे शक्य आहे,  मात्र, नितीश यांना विरोधकांच्या महाआघाडीच्या प्रमुखपदी पाहणे, हे निव्वळ स्वप्नरंजन असल्याच्या वास्तवाची जाणीवही यावेळी त्यांनी करून दिली.नितीश कुमार यांचा पक्ष प्रादेशिक राजकारणापुरता मर्यादित असला तरी त्यांचा चेहरा हा सर्वमान्य आहे. याउलट देशभरात व्याप्ती असलेल्या काँग्रेस पक्षाकडे नेतृत्त्वाचा अभाव आहे. त्यामुळे काँग्रेसने दिलदारपणा दाखवून नितीश यांच्याकडे महाआघाडीचे सूत्रे दिली तर आगामी काळात विरोधकांना नक्कीच संधी आहे. हे कदापि घडणार नाही. मात्र, लोकशाही समाजातील घटक म्हणून मी एवढे स्वप्नरंजन करू शकतो, असे गुहा यांनी म्हटले. या मुलाखतीदरम्यान गुहा यांनी राहुल गांधी यांच्यावरही हल्ला चढवला. राहुल गांधी यांनी स्वत:च्या पक्षावर आणि देशावर उपकार म्हणून राजकारण सोडून दुसरा पेशा स्वीकारावा. कदाचित देशाला काँग्रेस पक्षाची गरज आता राहिलेली नाही. त्यांची जागा दुसरा एखादा पक्ष घेईल, असा अंदाज वर्तवत राहूल गांधी यांच्या नेतृत्वावर हल्ला चढवला