राहुल गांधींनी देशाची माफी मागावी-आमदार अतुल साव

blank

टीम महाराष्ट्र देशा  : लढाऊ राफेल विमानाच्या खरेदीवरून पंतप्रधानांना राहुल गांधींनी चौकीदार चोर है, अशा शब्दांत आरोप केले. तसेच याच मुद्यावरून कॉंग्रेसने निवडणुकाही लढविल्या, याप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधानांना क्लिन चिट दिली. त्यामुळे याच मुद्याचे भांडवल करून बदनामी केल्याबद्दल राहुल गांधींनी देशाची माफी मागावी, तसेच निवडून आलेल्या आमदारांनीही माफी मागावी अशी मागणी आमदार सावे यांनी केली.

राफेल खरेदीवरून सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना क्लिन चिट दिल्याने कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, या मागणीसाठी आमदार अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली भाजपतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली तसेच “मै भी चौकीदार हूं’, अशा घोषणा दिल्या.

“लढाऊ राफेल विमानाच्या खरेदीवरून पंतप्रधानांना राहुल गांधींनी चौकीदार चोर है,” अशा शब्दांत आरोप केले. तसेच याच मुद्यावरून कॉंग्रेसने निवडणुकाही लढविल्या. याप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधानांना क्लिन चिट दिली. त्यामुळे याच मुद्याचे भांडवल करून बदनामी केल्याबद्दल राहुल गांधींनी देशाची माफी मागावी; तसेच निवडून आलेल्या आमदारांनीही माफी मागावी, अशी मागणी यावेळी आमदार सावे यांनी केली . मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड म्हणाले, मोदी यांच्यावर टीका करून राहुल गांधी यांनी देशाची बदनामी केली,  त्यामुळे त्यांनी तातडीने माफी मागावी.

आंदोलनात भगवान घडामोडे, अनिल मकरिये, प्रशांत देसरडा, कचरू घोडके, विजय औताडे, दिलीप थोरात, गोकुळ मलाके, हुशारसिंग चौहान, गजानन बारवाल, राजगौरव वानखेडे, आकाश बसय्ये, धनंजय कुलकर्णी, बालाजी मुंडे, शिवाजी दांडगे, पालोदकर, राम बुधवंत, माधुरी अदवंत, जयश्री कुलकर्णी, मनीषा भन्साली आदींचा सहभाग होता

महत्वाच्या बातम्या