राहुल गांधींचा लवकरच राज्याभिषेक

राहुल गांधी

टीम महाराष्ट्र देशा: कॉंग्रस उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या कमालीच्या फॉर्म मध्ये आहेत. गुजरात निवडणुकीत राहुल गांधी यांच्या झंझावाती प्रचार सभांनी सत्ताधाऱ्यांची झोप उडवली आहे. कधीकाळी विरोधक ‘पप्पू’ म्हणून टीका करत होते पण आता भाषण असो वा सोशल मेडिया राहुल गांधी जबरदस्त फॉर्म मध्ये दिसत आहेत. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून राहुल कॉंग्रेसचे अध्यक्ष होणार की नाही याची प्रतीक्षा संपण्याचे चिन्ह दिसत आहेत.

सोनिया गांधी यांनी सोमवारी दिल्लीत काँग्रेस पक्षातील अंतर्गत निवडणुकांचे वेळापत्रक निश्चित करण्यासाठी बैठक बोलावली आहे. संभाव्य वेळापत्रकानुसार २४ नोव्हेंबरपर्यंत अध्यक्षपदासाठीच्या इच्छूक उमेदवारांना नामांकन अर्ज दाखल करता येणार आहेत. २४ नोव्हेंबरपर्यंतही प्रक्रिया सुरू राहिल. मात्र २४ नोव्हेंबरपर्यंत राहुल यांच्याशिवाय कुणाचाच अर्ज आला नाही तर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून राहुल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.

१ डिसेंबरपर्यंत नामांकन अर्ज मागे घेता येणार आहेत. अध्यक्षपदासाठी इतर नामांकन अर्ज आल्यास ८ डिसेंबर रोजी निवडणूक होणार असून ११ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, राहुल यांच्या विरोधात कोणीच उभे राहणार नसून ते बिनविरोध निवडून येतील, असे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले.