कर्नाटकमध्ये राहुल गांधींचे ‘टेम्पल रन’ सुरु

कनकगिरीमधील मंदिरात घेतले दर्शन

आजवर हिंदू पॉलिटिक्सपासून स्वत:ला दूर ठेवणारी कॉंग्रेस आता कुठेतरी सॉफ्ट हिंदुत्वाचा अजेंडा राबवताना दिसत आहे. त्यामुळेच गुजरात निवडणुकीच्यावेळी कॉंग्रेससाठी कमालीची फायदेशीर ठरलेल्या मंदिर डिप्लोमसीची पुनरावृत्ती कर्नाटकमध्ये होताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकमध्ये कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जन आशीर्वाद यात्रेच आयोजन आल आहे. या दरम्यान आज त्यांनी कनकगिरीमधील कनकचलापथी मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

सध्या कर्नाटकमध्ये कॉंग्रेसचे सरकार अस्तित्वात असून सिद्धरामय्या हे मुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत. राज्यात असणाऱ्या लिंगायत बहुल मतदारांना खुश करण्यासाठी याआधीच सिद्धरामय्या यांनी लिंगायतांकडून करण्यात येणाऱ्या वेगळ्या धर्माच्या मागणीला पाठींबा दर्शवला आहे. त्यासाठी खास समितीची स्थापना देखील करण्यात आली. दरम्यान या समाजाचा भगवान महादेवाशी असणारा भावनिक जिव्हाळा लक्षात घेवून राहुल गांधी हे अनेक शिवालयांना भेट देणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

जन आशीर्वाद यात्रे दरम्यान राहुल गांधी हे बेल्लारी, कोपल, रायचूर, गुलबर्गा आणि बदर येथे प्रचार सभा घेणार आहेत. काल बेल्लारी येथील जाहीर सभेत नरेंद्र मोदींचे शब्द पोकळ असतात. ते जे बोलतात ते करीत नाहीत म्हणत मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली होती. तर कर्नाटक भाजप अध्यक्ष येदुरप्पा यांनी राहुल गांधी हे केवळ निवडणुकीपुरते हिंदू असल्याच म्हणत गांधी यांच्या मंदिर डिप्लोमसीवर टीका केली.

You might also like
Comments
Loading...