fbpx

१९८४ च्या दंगलीमुळे खूप त्रास झाला, जबाबदार लोकांवर कारवाई व्हायला हवी – गांधी

टीम महाराष्ट्र देशा: कॉंग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी १९८४ च्या शीख विरोधी दंगली विषयी केलेले विधान चुकीचे आहे, त्यामुळे त्यांनी देशाची माफी मागायला हवी, अशा शब्दात कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पित्रोदांना सुनावले आहे. अशा प्रकारे वक्तव्य करताना सॅम पित्रोदा यांना लाज वाटायला हवी, असे खडेबोल देखील गांधी यांनी सुनावले आहेत.

पित्रोदा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना १९८४ मध्ये जे झाल ते झाल, पण मोदींनी मागील पाच वर्षात काय केले ते सांगाव, असे विधान केले होते. पित्रोदा यांच्या विधानानंतर भाजपने कॉंग्रेसवर टीकेची झोड उठवली होती.

पंजाबमधील फतेहगढ़ साहिब येथे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, पित्रोदा यांना आपण स्वतः फोन करत त्यांनी शीख विरोधी दंगलीबद्दल केलेले विधान चुकीचे असून लाज वाटायला हवी, विधानबद्दल देशाची मागावी असे सांगितले आहे.

दरम्यान, १९८४ च्या दंगलीमुळे खूप त्रास झाला, जबाबदार लोकांवर कारवाई व्हायला हवी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, माझी आई सोनिया गांधी यांनी माफी मागितली आहे. ही दंगल आपल्यासाठी एक मोठी दुर्घटना असल्याचे राहुल गांधी यांनी म्हंटले आहे.