राहुल गांधी भारतात परतले, ‘या’ तारखेला प्रचारासाठी मुंबईत येणार

टीम महाराष्ट्र देशा:- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी कंबोडीया दौऱ्यावरून भारतात परतले आहेत.राहुल गांधी यांचे आज सुरत येथे आगमन झाले. त्यानंतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी व गुजरात मधील जनतेने मोठ्या उत्साहात स्वागत केले.

यावेळी राहुल गांधी म्हणाले, तोडाफोडीचे राजकारण करणाऱ्या व विरोधी पक्षाचा आवाज दाबणाऱ्या भाजपाच्या राजकारणाच्या विरोधात काँग्रेस चा लढा हा कायमस्वरूपी चालू राहील व अंतिम विजय हा काँग्रेसचाच होईल असे यावेळी बोलताना म्हणाले.

दरम्यान आज सुरत येथील न्यायालयात राहुल गांधी यांनी एका खटल्यांसंदर्भात हजेरी लावली. उद्या ते   अहमदाबादच्या न्यायालयात हजेरी लावणार आहेत. त्यानंतर ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. १३ ऑक्टोबरला राहुल गाँधी मुंबईत प्रचारासाठी येणार आहेत. महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधीनी आतापर्यंत प्रचारात सक्रीय होणं अपेक्षित होतं. पण ते परदेशात गेले होते. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती.

महत्वाच्या बातम्या