पैसा, सत्ता हेच सर्व काही नाही; राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका

नरेंद्र मोदी हेच भ्रष्ट्राचार आहेत. पैसा, सत्ता हे सर्व काही नाही, राष्ट्रगीत सुरु होण्याआधीच भाजपचे आमदार आणि सभापती सभागृहातून निघून गेले, यावरूनच सत्तेच्या धुंदीमुळे कोणत्याही संस्थेचा मान भाजप नेते राखताना दिसत नसल्याची खरमरीत टीका कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर केली आहे. कर्नाटकमध्ये बहुमत सिद्ध करता येत नसल्याने येडीयुरप्पा यांनी अवघ्या ५५ तासांत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाना साधला.

देशापेक्षा पंतप्रधान पड मोठे नाहीत, देशात जनतेची ताकदच सर्वकाही आहे. कर्नाटक विधानसभेत झालेल्या पराजयानंतर भाजप आणि संघाने धडा घ्यावा असा सल्लाही यावेळी राहुल गांधी यांनी भाजपला दिला आहे.

कर्नाटक विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करण्यात भाजपचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना अपयश आले आहे, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आज कर्नाटक विधानसभा सभागृहात भाजपला विश्वासदर्शक ठराव मांडायचा होता. मात्र, दिवसभराच्या पळापळीनंतर देखील भाजपला बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश येत असल्याच दिसल्याने येडीयुरप्पा यांनी आपण राजीनामा देत असल्याच घोषित केले. राजीनामा देत असताना येडीयुरप्पा यांनी भावनिक भाषण करत कर्नाटकच्या जनतेला साद घालण्याचा प्रयत्न केला

बहुमतासाठीचा आकडा गाठण्यात अपयश येत असल्याने पक्षाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि येडीयुरप्पा यांच्यामध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर बी एस येडीयुरप्पा यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान आता जेडीएसचे कुमारस्वामी हे कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होतील.

You might also like
Comments
Loading...