राहुल गांधी ‘राम’ तर नरेंद्र मोदी ‘रावण’ अमेठीत वादग्रस्त फलक

2019 में आएगा राहुलराज (रामराज)

अमेठी : पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘रावण’ तर राहुल गांधी ‘राम’ अस वादग्रस्त फलक उत्तर प्रदेशमधील अमेठी शहरात गौरीगंज रेल्वे स्टेशन परिसरात लावण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या अमेठी दौ-याच्या एक दिवसापूर्वी म्हणजेच रविवारी १४ जानेवारी ही वादग्रस्त अशी पोस्टरबाजी करण्यात आली आहे.

सादर फलकात राहुल गांधी बाण घेऊन नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधत आहेत. तसेच ‘राहुल में भगवान राम का अवतार, २०१९ में आएगा राहुल राज (रामराज)। असे या पोस्टरवर लिहिण्यात आलेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे वादग्रस्त पोस्टर अभय शुक्ला नावाच्या एका स्थानिकानं लावले आहे. दरम्यान, शुक्लानं काँग्रेस पार्टीसोबत कोणतेही संबंध नसल्याचे सांगितले.