Share

Rahul Gandhi | राहुल गांधींचे मातृप्रेम! आईला पायी चालतांना पाहून केले असे काही की…

नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे भारत जोडो यात्रेवर आहेत. ही यात्रा केरळ पर्यंत पायी करत असून आता कर्नाटकमध्ये पोहचली आहे. अशातच सोनिया गांधी यांनी देखील या यात्रेत सहभाग घेतला. मात्र, यावेळी सोनिया गांधी (Sonia Gandhi) पायी चालत असताना राहुल गांधी यांचं मातृप्रेम पाहायला मिळालं आहे.

सोनिया गांधी यांचा भारत जोडो यात्रेत सहभाग –

राहुल गांधींच्या मातृप्रेमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोनिया गांधी यांनी भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला. यानंतर त्या पायी चालत होत्या. मात्र, भर उन्हात आपल्या आईला पायी चालताना बघून राहुल गांधींनी सोनिया गांधींना गाडीत बसण्यास सांगतिलं. सोनिया गांधी यांना पायी चालायचं होतं मात्र, तरी देखील राहुल गांधींनी त्यांना गाडीत बसण्यासाठी हट्ट केला.

नितीन राऊत यांचं राहुल गांधी यांच्यावर ट्विट –

हा व्हिडीओ शेअर करत काँग्रेस नेते नितीन राऊत (Nitin Raut) यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटला मेरे मां के बराबर कोई नही, असं कॅप्शन देण्यात आलं आहे. काही वेळ आराम करुन सोनिया गांधी परत यात्रेमध्ये सहभागी झाल्याचं नंतर पाहायला मिळालं.

पाहा ट्विट –

राहुल गांधी यांची भर पावसात सभा –

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो नुकतीच तामिळनाडू, केरळमधील प्रवास पूर्ण करुन कर्नाटक राज्यात पोहोचली आहे. ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकातील म्हैसूर येथे मुसळधार पावसात सभा घेतली. देशाला एकजूट करण्यापासून आम्हाला कुणीही रोखू शकत नाही’, असे ठणकावून सांगत यावेळी राहुल हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बरसले.

सातारा येथे 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भरपावसात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभा घेतली होती. त्या सभेचे स्मरण कालच्या राहुल यांच्या सभेने सर्वांना झाले. कर्नाटकमध्ये राहुल गांधी यांनी काल म्हैसूरमध्ये उपस्थित समुदायाला भरपावसात संबोधित केलं. राहुल गांधी यांच्या सभेचं वैशिष्ट्य म्हणजे भरपावसात त्यांनी संवाद साधला. आपल्याला भारताला जोडायचं असल्याचं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे भारत जोडो यात्रेवर आहेत. ही यात्रा केरळ पर्यंत पायी …

पुढे वाचा

Marathi News Politics