Share

Rahul Gandhi | “सिलेंडरची किंमत ४०० रुपये होती तेव्हा पंतप्रधान तक्रार करायचे, आता…”, राहुल गांधींनी विचारले सवाल

नवी दिल्ली : 70 वर्ष सत्तेत राहिल्यानंतर भाजप पक्षाचे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. पंतप्रधान होण्यापुर्वी नरेंद्र मोदींनी अच्छे दिन आणण्याचं आश्वासन दिलं होतं. तर सिलेंडर देखील ४०० रुपये असल्याने तक्रार केली होती. मात्र, मोदींनी अनेक आश्वासने अपुर्ण ठेवल्याने काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांनी प्रश्नावलीच उपस्थित केली आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट देखील केलं आहे.

राहुल गांधी यांचे नरेंद्र मोदी यांना प्रश्न –

पंतप्रधानांनी दरवर्षी 2 कोटी नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते, ते आज आपल्या तरुणांचा सामना करू शकतात का ?एलपीजी सिलिंडरची किंमत ४०० रुपये असल्याची तक्रार पंतप्रधान करत होते. आता त्याची किंमत ₹1000+ आहे, याचं उत्तर ते आज आपल्या लोकांना शकतील का?, असा सवाल राहुल गांधींनी केला आहे. तसेच ८ वर्षात तुम्ही भारताला विक्रमी बेरोजगारी आणि महागाई दिली आहे. असं ७० वर्षांमध्येच कधीच नाही झालं, असं देखील ते म्हणाले.

पाहा ट्विट –

राहुल गांधींच्या ट्विटवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. यामध्ये अनेकांनी नरेंद्र मोदींना धारेवर धरलं आहे. ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकातील म्हैसूर येथे मुसळधार पावसात सभा घेतली. ही सभा प्रचंड व्हायरल झाली आहे.

यावेळी सुद्धा, बेरोजगारी आणि रोजगाराचा मुद्दा काँग्रेस मांडत राहील, असं राहुल गांधी यांनी म्हटलं. भरपावसात देखील राहुल गांधी यांच्या सभेला उपस्थितांनी प्रतिसाद दिला. आपल्याला भारताला जोडायचंय, असंही ते म्हणाले. काँग्रेस पक्षानं त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. राहुल गांधींनी देखील तो व्हिडिओ ट्विट केला आहे.

लोक तिरस्काराची भाषा करतील तितकंच आपल्याला देशाला जोडायचं आहे, असं राहुल गांधी म्हणाले. आपण बेरोजगारी आणि रोजगाराच्या मुद्यावर आवाज उठवत राहू, असं ते म्हणाले. तुम्ही भर पावसात सभेला उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे आभार मानतो, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

नवी दिल्ली : 70 वर्ष सत्तेत राहिल्यानंतर भाजप पक्षाचे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. पंतप्रधान होण्यापुर्वी नरेंद्र मोदींनी अच्छे दिन आणण्याचं …

पुढे वाचा

Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now