fbpx

राहुल गांधी, पवार कान खोलून ऐका, आम्ही आरक्षण हटवणार नाही, हटवूही देणार नाही

amit shaha

मुंबई: भाजपाच्या ३८व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईमध्ये झालेल्या मेळाव्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा म्हणाले, राहुल गांधी, पवार कान खोलून ऐका, आम्ही आरक्षण हटवणार नाही आणि तुम्हाला हटवू देणार नाही. दरम्यान त्यांनी राहुल गांधींवर जोरदार प्रहार केले.

अमित शहा म्हणाले, काँग्रेसने देशासाठी काय केले ? राहुल बाबा तुम्ही साडेचारवर्षांचा हिशोब मागता? देशाची जनता तुमच्याकडे चार पिढयांचा हिशोब मागतेय. तुम्ही इतकी वर्षा सत्ता असून काय केले ? नरेंद्र मोदींनी उज्वल योजना, मेडिक्लेम अशा योजनांमधून सर्वसामान्य नागरीकांपर्यंत लाभ पोहोचवले. तसेच २०१९च काऊंटडाऊन सुरू झाल आहे. आपली कामे आपली काम लोकांपर्यंत पोहोचवा. असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.

शरद पवारांनी इंजेक्शन दिल्यावरच राहुल गांधी बोलतात असे म्हणत अमित शाह यांनी राहुल गांधीसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका केली. अमित शाह म्हणाले की, भाजप आरक्षण कधीच बंद करणार नाही, तसा कुणी प्रयत्न केला तरी तो यशस्वी होऊ देणार नाही. रोज सीमेवर हल्ले होत असताना, जवानांची मुंडी छाटली जात होती. त्यावेळी सरकारला काही फरक पडत नव्हता. पण आम्ही उरीचा बदला घेतला. संपूर्ण जगात एक वेगळा संदेश गेला. देशाकडे बघण्याचा दृष्टीकोन  बदलला असे अमित शहा म्हणाले.

1 Comment

Click here to post a comment