मराठीतून ट्विट करत राहुल गांधी महाराजांसमोर नतमस्तक

टीम महाराष्ट्र देशा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मराठीमधून ट्विट करून महाराजांना नमन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते, असे राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

काय आहे राहुल गंधे यांचे ट्विट ?

छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. सर्व समाजातील मावळे एकत्रित करून त्यांनी स्वराज्य उभारलं आणि जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला, त्यांचं जीवन आणि राज्य कारभार जगासाठी अनुकरणीय आहे. या महान राजास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.