२०१४ मध्ये संघावर केलेली टीका राहुल गांधींना भोवली

राहुल गांधी

ठाणे : भिवंडी येथील प्रचारसभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी आरोप केल्याप्रकरणी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पुढील सुनावणीला हजर रहाण्याचेच आदेश भिवंडी न्यायालयाने आज दिले. या संदर्भात २३ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

काल झालेल्या सुनावणीला राहुल गांधी गैरहजर असल्याने त्यांच्या वतीने वकील नारायण अय्यर यांनी बाजू मांडली. त्यामुळे पुढील सुनावणी वेळी राहुल गांधींना हजर रहाण्याचे आदेश देण्यात आले.

२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत महात्मा गांधींची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. या वक्तव्याविरोधात संघाचे शहर कार्यवाह राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात ६ मार्च २०१४ रोजी याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी सुरू आहे.