राहुल गांधींनी केल पंतप्रधान मोदींना खुल आव्हान, म्हणे या भ्रष्टाचाराच्या मुद्यावर चर्चा करू !

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या ट्वीटर वरून एक आव्हान दिले आहे. मोदींनी हिंमत असेल तर राफेल, नोटबंदी आणि नीरव मोदी या प्रकरणांवर माझ्याशी चर्चा करावी आणि चर्चे साठी अभ्यास करून यावा अस खुल आव्हान नरेंद्र मोदी यांना राहुल गांधी यांनी दिले आहे. जर मोदींना या विषयांवर चर्चा करण्यास अवघड जात असेल तर आपण ओपन बुक चर्चा करू असे देखील ते म्हंटले आहेत.

यावेळी राहुल गांधी म्हणाले की, नरेंद्र मोदीजी, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर तुम्ही माझ्याशी चर्चा करण्यास घाबरता का? मी तुमच्यासाठी हे सोप्प करुन देतो. पुस्तके उघडून तुम्ही खालील विषयांवर चर्चेची तयारी करा. पहिलं -राफेल आणि अनिल अंबानी, दुसरं – नीरव मोदी आणि तिसरं अमित शहा आणि नोटाबंदी या मुद्द्यांवर चर्चा करण्याचं आव्हान राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे.