राहुल गांधींनी घेतले पंतप्रधानांना अपशब्द काढणाऱ्या मणिशंकर अय्यर यांचं निलंबन मागे !

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नीच असे संबोधणाऱ्या काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी हा निर्णय घेतला. मणिशंकर अय्यर यांनी गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात मोदींना नीच असे संबोधले होते. त्यामुळे काँग्रेसने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करताना प्राथमिक सदस्यत्व रद्द केले होते.

काँग्रेस महासचिव अशोक गेहलोत अधिसुचना प्रसिद्ध करत निलंबन मागे घेण्यात आल्याचे स्पष्ट केले. गेल्यावर्षी गुजरात विधानसभा निवडणुकीत मोदी यांनी प्रचारसभेत काँग्रेस दलित मतांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा वापर करत असल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर त्यांचे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला होता. मोदींच्या या दाव्यानंतर मणिशंकर अय्यर मोदी यांना नीच म्हणाले होते. त्यानंतर मणिशंकर अय्यर यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता, पण मोदींनी अय्यर यांच्यासह काँग्रेसला फैलावर घेतले होते.

धर्माच्या आधारे देशाचे विभाजन करण्यासाठी सावरकरच जबाबदार – अय्यर