भारताने एक महान सुपुत्र गमावला : राहुल गांधी

congress-vp-rahul-gandhi-asks-pm-narendra-modi-speak-up-on-jai-shah-case

टीम महाराष्ट्र देशा- भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे, वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र, मागील 48 तासांत त्यांची प्रकृती जास्त खालावली होती.

भारताचे माजी पंतप्रधान, कविमनाचे साहित्यिक, अजातशत्रू राजकारणी, मुत्सद्दी नेता अशी ओळख अनेकांगी ओळख असलेले अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. वाजपेयी प्रकृती खालावल्यामुळे गेले नऊ आठवडे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल होते. गुरुवारी संध्याकाळी 5.05 मिनिटांनी त्यांचं निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले आहे.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर राजकीय, सामिजीक, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील लोकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. भारताने एक महान सुपुत्र गमावला असे ट्वीट करून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

चालता-बोलता विश्वकोष काळाच्या पडद्याआड गेला : सुप्रिया सुळे

उद्धव ठाकरे यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी वाहिली श्रद्धांजली.
अटलजी आपल्यात नाहीत यावर विश्वास ठेवायला मन तयार नाही. अटलजी आमच्या हृदयात आहेत. सदैव राहतील, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख अहंकार, गर्व, सत्तेतून निर्माण होणारा ताठरपणा त्यांच्यापासून मैलोन् मैल दूर होता. ते सरळ स्वभावाचे, निष्कपट राजकारणी होते. तीन वेळा देशाचे पंतप्रधान होते. पण राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्व लहान-मोठ्या घटक दलांच्या हातात हात घालून त्यांनी सरकार पुढे नेले. त्यांना भेटण्याचा योग अनेकदा आला. एका वडिलधाऱ्याच्या मायेने त्यांनी प्रेम केले. सदैव आशीर्वाद दिले.

त्यांचे निर्मळ मन व सदैव हसतमुख चेहरा म्हणजे भारतीय राजकारणाची प्रेरणा होती. शिवसेनाप्रमुखांशी असलेला त्यांचा स्नेह जगजाहीर होता. अनेक विषयांवर त्यांच्यात चर्चा होत असत. अटलजींच्या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या भूमिकेमुळे ‘एनडीए’ मजबूत राहिली. अटलजींच्या जाण्याने संसदीय लोकशाहीची, देशाची प्रचंड हानी झाली. शिवसेनाप्रमुखांनंतर आम्ही आणखी एक भीष्म पितामह गमावला. त्यांच्या महान व्यक्तिमत्वास सांष्टांग दंडवत घालून आम्ही विनम्र आदरांजली वाहत आहोत. शिवसेना परिवार त्यांना मानवंदना देत आहे. अटलजी, तुमच्यासारखे तुम्हीच. तुमची जागा कोणीच घेऊ शकणार नाही.

अटलजी सर्वसमावेशक, ते मोदी सरकारसारखे नव्हते : ममता बॅनर्जी