राहुल गांधींच्या प्रस्तावाला कर्नाटक कॉंग्रेसकडून केराची टोपली

rahul gandhi

टीम महाराष्ट्र देशा- सॅम पित्रोदा आणि पक्षाचे महासचिव जनार्दन द्विवेदी यांच्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी पाठवलेला प्रस्ताव कर्नाटक काँग्रेसने अमान्य केला आहे. गांधी परिवाराच्या जवळचे समजले जाणाऱ्या या दोघांना राज्यसभेत जाता यावे यासाठी राहुल गांधींनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांना लक्ष घालण्याचे सांगितले होते.16 राज्यातील एकूण 58 जागांसाठी 23 मार्चला मतदान होणार आहे.

कर्नाटक काँग्रेसचं नेमकं काय म्हणणं आहे.
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. विधानसभा निवडणुकाआधी राज्याबाहेरील व्यक्तीला कर्नाटकमधून राज्यसभेवर पाठवले तर काँग्रेसला ते नुकसानदायक ठरू शकते.मंगळवारी दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत सिद्धरमय्या यांनी राहुल यांना निवडणुकीआधी कर्नाटकमधून बाहेरच्या व्यक्तीला राज्यसभेत पाठवल्यास हा निर्णय पक्षासाठी नुकसानदायक ठरू शकतो, असे सांगितले.

कोणत्या पक्षाचे किती खासदार?:भाजप -17, काँग्रेस – 12, समाजवादी पक्ष – 6, जदयू – 3, तृणमूल कॉंग्रेस – 3, तेलुगू देसम पक्ष – 2, राष्ट्रवादी कॉंग्रेस – 2, बीजद – 2, बसप – 1, शिवसेना – 1, माकप – 1, अपक्ष – 1, राष्ट्रपती नियुक्त – 3