राहुल गांधी म्हणजे नरेंद्र मोदी समोर नाल्यातील किड्याप्रमाणे – केंद्रीय मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना स्क्रिझोफेनिया जडला आहे खरं तर त्यांना आता  वेड लागले असून मनोरूग्णालयात पाठवले पाहिजे असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री अश्विनी चौबे यांनी केले आहे.  त्यांना लवकरात लवकर मनोरूग्णालयात उपचारासाठी दाखल केले पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले. राहुल गांधी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी समोर नाल्यातील किड्याप्रमाणे आहेत.

देशाच्या पंतप्रधाना बदल  राहुल गांधी यांनी अपशब्द वापरले आहेत. मात्र राहुल गांधी हे एखाद्या नाल्यातील किड्याप्रमाणे आहेत ते स्वतःच भारत काँग्रेस मुक्त करतील असे अश्विनी चौबे यांनी म्हटले आहे. तसेच महाआघाडीला त्यांनी ठगबंधन आहे असे म्हटले आहे. महाठगआघाडीच्या नेत्यांना जनतेची हाय लागणार आहे असेही ते यावेळी बोलत होते.