‘त्या’ व्हिडिओ प्रकरणी राहुल गांधींनी मागितली बाल हक्क आयोगाकडे दहा दिवसांची मुदत

नवी दिल्ली : महाराष्ट्र बाल हक्क आयोगाने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना नोटीस बजावली होती त्यास उत्तर देण्यासाठी अजून दहा दिवसांची मुदत मागितली आहे. जामनेर तालुक्यातील वाकडी येथे विहिरीत पोहायला गेलेल्या मुलांना नग्न करून त्यांना मारहाण केल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटर वर भाष्य करून एक व्हिडिओही ट्विटरवर अपलोड केला होता.या घटनेसंबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून चार आरोपींना अटकही करण्यात आली होती. त्या आरोपींवर ‘पॉक्सो’ अंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

परंतु या संदर्भात राहुल गांधी यांनी ट्विट करून पीडित मुलांचा व्हिडिओ अपलोड करुन बाल हक्क कायद्यानुसार उल्लंघन झाले प्रकरणी बाल हक्क आयोगाकडे तक्रार प्राप्त झाली होती.बाल न्याय अधिनियम कायद्यातील कलमानुसार कुठल्याही पीडित बालकाचे फोटो, व्हिडिओ किंवा त्याचे नाव जाहीर न करणे जेणेकरून त्यांची ओळख पटू नये असे म्हंटले आहे*. राहुल गांधी यांनी यासंबंधीत मुलांचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल केल्याने या कायद्याचा भंग झाल्याचा तसेच ‘बाल लैंगिक प्रतिबंधक कायदा (पॉक्सो) नुसार या आरोपींन वर गुन्हा दाखल केलेला असतानाही या कायद्यातील ‘कलम 23’अन्वये अशा प्रकारचा कुठलाही व्हिडिओ अथवा फोटो प्रसारीत करणे गुन्हा मानण्यात येतो.

Loading...

याही कायद्याचे राहुल गांधी यांच्या कडून उल्लंघन झाल्याच्या विषयी स्पष्टीकरण देण्यासाठी राहुल गांधी यांना महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण आयोगाने नोटीस बजावली होती. सदर नोटीस आपणास 22 जुन रोजी मिळाल्याचे सांगुन तक्रार अर्ज मराठीत असल्याने तो इंग्रजीमधून उपलब्ध करुन देण्याची तसेच उत्तर देण्यासाठी आणखी दहा दिवसांची मुदत देण्याची मागणी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे यांना दिलेल्या पत्रात केली आहे.

माझी आई अनेक भारतीयांपेक्षा जास्त भारतीय – राहुल गांधी

भाजपने आमचाचं जाहीरनामा चोरला – राहुल गांधी

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका