राहुल गांधी माझ्या भावासारखे; मी त्यांना राखी बांधते- अदिती सिंग 

नवी दिल्ली: राहुल गांधी आणि आमदार अदिती सिंग यांचे फोटो गेले काही दिवस सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनले आहेत. त्यामुळे राहुल गांधी आणि अदिती सिंग यांच्या लग्नाच्या चर्चेला उधान आले होते. मात्र याबाबत सिंग यांनी सोशल मिडीयावर रोष व्यक्त केला आहे.

अदिती सिंग म्हणाल्या, मी काल खूप चिंतेत होते. सोशल मिडीयावर राहुल गांधी आणि माझ्या लग्नाच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. राहुल गांधी माझ्या भावासारखे असून मी त्यांना राखी बांधते. ज्यांनी अफवा पसरवल्या त्यांनी सुधारा, अशे म्हणत सिंग यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशे फोटो शेयर करून  कॉंग्रेसला बदनाम करण्याचे षडयंत्र रचल्या जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Gadgil