मोदी सरकारचा हिशोब मांडताना राहुल गांधींचे गणित चुकले

rahul_gandhi

टीम महाराष्ट्र देशा: गुजरात निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच शीगेला पोहचला आहे. कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे मोदी सरकारच्या कामांचा समाचार घेयला थोडेही कमी पडत नाहीयेत. मात्र मोदी सरकारचा हिशोब मांडताना राहुल गांधींचे गणित चुकल्याच दिसत आहे.

raga 1st tweet

झाल अस कि गुजरातमध्ये मोदी हे पंतप्रधान असताना दैनंदिन वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाल्याच ग्राफिक्स राहुल यांनी ट्विट केलं. मात्र यामध्ये महागाईची टक्केवारी मात्र चुकली होती.

दरम्यान ही चूक लक्षात येताच त्यांनी ते ट्विट डिलीट करत नवीन ट्वीट केलं.