भाजपच्या पराजयाने राजकीय हालचालींना वेग ; राहुल गांधींनी घेतली शरद पवारांची भेट

टीम महाराष्ट्र देशा : बिहार आणि उत्तर प्रदेश मध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपला मोठ्या पराजायचा सामना करावा लागला आहे. सपा-बसपा एकत्र येथ उत्तर प्रदेश मध्ये भाजपला धूळ चारल्यानंतर दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी संध्याकाळी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं दिल्लीतील निवासस्थान गाठलं. तिथे शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यात तासभर चर्चा झाली. सलग दोन दिवसातील ही दुसरी भेट आहे.

या डिनर डिप्लोमसीनंतर राहुल गांधींनी संपर्क अभियानाला सुरुवात केल्याचं दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात मोदी विरोधकांची मोट बांधण्यासाठी राहुल गांधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनाही भेटण्याची शक्यता आहे.

सोनिया गांधींनी दोन दिवसांपूर्वी मेजवानीच्या निमित्ताने भाजपविरोधातील समविचारी पक्षांशी अनौपचारिक बोलणी केली होती. आपल्या निवासस्थानी आयोजित केलेल्या डिनरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सीपीआयएम, सीपीआय, तृणमूल काँग्रेस यांसह २० विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली.

Loading...