काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

नवी दिल्ली – काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेस खासदारांच एक शिष्टमंडळही उपस्थित होतं. शेतक-यांच्या मुद्द्यावरुन राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. यावेळी राहुल गांधी यांनी शेतक-यांना कर्ज माफ करण्याची मागणी केली आहे.

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत शेतक-यांच्या विविध समस्यांसंदर्भात चर्चा केली. शेतक-यांना कर्ज माफी, त्यांच्या पिकांना योग्य दर देणे तसेच नोटाबंदीनंतर जमा झालेली रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरण्यात यावी अशी मागणी केली आहे. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा यांच्यासह इतरही नेते उपस्थित होते. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. नोटाबंदीप्रकरणी संसदेत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.