राहुल गांधी भाजपा केवळ मोदी लाटेपर्यंतच सत्तेत राहणार आहे या भ्रमात आहे – प्रशांत किशोर

राहुल गांधी भाजपा केवळ मोदी लाटेपर्यंतच सत्तेत राहणार आहे या भ्रमात आहे – प्रशांत किशोर

prashat kishor

पणजी : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सत्तेच्या स्वप्नांना सुरुंग लावणाऱ्या तृणमूल काँग्रेस म्हणजेच ममता बॅनर्जी यांच्या विजय निश्चित करणारे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आता मोठे विधान केले आहे. भाजपला आनंद गगनात मावणार नाही, असं विधान प्रशांत किशोर यांनी केलं आहे. गोव्यातील एका कार्यक्रमादरम्यान प्रशांत किशोर बोलत होते. भाजप आता पुढील अनेक दशकं सत्तेत राहिल. भाजप हटणार नाही आणि राहुल गांधींना हे समजत नाही, ही मोठी समस्या आहे, असं प्रशांत किशोर म्हणाले.

प्रशांत किशोर यांनी अनेक दशके भाजपाच्या वर्चस्वाचा अंदाज वर्तवण्याबरोबरच प्रशांत किशोर यांनी राहुल गांधींचीही खिल्ली उडवली आणि म्हणाले की, राहुल गांधी भाजपा केवळ मोदी लाटेपर्यंतच सत्तेत राहणार आहे या भ्रमात आहे. भाजपा जिंकेल किंवा हरेल, पण काँग्रेसच्या ४० वर्षांच्या कारभाराप्रमाणेच ते भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी राहतील. भाजपा कुठेही जाणार नाही. तुम्हाला भारतात ३० टक्के मते मिळाली की तुम्ही इतक्या लवकर कुठेही जाणार नाही. त्यामुळे लोक संतप्त होऊन मोदींना उखडून टाकतील या चक्रव्यूहात कधीही पडू नका. लोक मोदींना हटवू शकतात, पण भाजपा कुठेही जाणार नाही. पुढील अनेक दशके तुम्हाला भाजपाचा सामना करावा लागेल,” असे प्रशांत किशोर म्हणाले.

“राहुल गांधींची हीच अडचण आहे. बहुधा, त्यांना असे वाटते की ही फक्त थोड्या वेळेची बाब आहे, जोपर्यंत लोक मोदींना सत्तेवरून घालवत नाहीत तो पर्यंत ते होणार नाही. जोपर्यंत तुम्ही मोदींची ताकद समजून घेत नाही आणि त्यांची ताकद स्वीकारत नाही, तोपर्यंत तुम्ही त्यांचा सामना करू शकणार नाही. मला दिसत असलेली अडचण अशी आहे की लोक मोदींची शक्ती समजून घेण्यास जास्त वेळ देत नाहीत, त्यांना समजत नाही की मोदी इतके लोकप्रिय कसे होत आहेत. जर तुम्हाला हे माहित असेल तरच तुम्ही त्यांचा सामना करू शकाल,” असे प्रशांत किशोर म्हणाले.

“तुम्ही काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याकडे जा, ते तुम्हाला सांगतील ही थोड्या वेळेची गोष्ट आहे. ही काळाची बाब आहे, लोक कंटाळले आहेत, सत्ताविरोधी लाट येईल आणि लोक मोदींना हटवतील. मला शंका आहे, असे होणार नाही. मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आणि तरीही त्यांच्याविरोधात मोठा जनक्षोभही निर्माण झालेला नाही,” याचे उदाहरणही प्रशांत किशोर यांनी दिले.

महत्त्वाच्या बातम्या