Share

Atul Bhatkhalkar | राहुल गांधी पंतप्रधान नाही, विको वज्रदंतीचे अ‍ॅम्बेसिडर नक्की होतील- अतुल भातखळकर

मुंबई : भारताला पुन्हा एकत्र जोडण्यासाठी आणि देशाला मजबूत करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने ७ सप्टेंबर २०२२ पासून भारत जोडो यात्रा सुरू झाली. देशातील ज्या राज्यांतून ही यात्रा जाणार नाही अशा राज्यांतून १००-१०० लोक या प्रवासात सहभागी झाले. हे लोक “पाहुणे प्रवासी” आहेत. तर ज्या राज्यातून ही पदयात्रा जाणार आहे त्या राज्यातूनही 1१००-१०० लोक या प्रवासात सामील झाले आहेत. या लोकांना “राज्य प्रवासी” म्हटले जाईल असं सांगण्यात आलं आहे.

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. त्यामध्ये राहुल गांधी ऊस खात असताना काढलेला एक फोटो समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटो संदर्भात भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी राहुल गांधी यांच्यावर बोचरी टीका केलीआहे. “राहुल गांधी हे पंतप्रधान तर होणारही नाहीत, पण विको वज्रदांतीचे ब्रँड ॲम्बेसडर नक्की होतील” असं म्हणत अतुल भातखळकर यांनी राहुल गांधी यांचा फोटो ट्विट केला आहे.

७ सप्टेंबर पासून तामिळनाडूतील कन्याकुमारी पासून राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेला सुरुवात झाली. १५० दिवसांच्या या यात्रेत ३५०० कि.मीचे अंतर कापले जाणार असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं . जम्मू-काश्मीर या राज्यात या यात्रेची सांगता होणार असल्याचंही ते म्हणाले.

दरम्यान, ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकातील म्हैसूर येथे मुसळधार पावसात सभा घेतली. देशाला एकजूट करण्यापासून आम्हाला कुणीही रोखू शकत नाही’, असे ठणकावून सांगत यावेळी राहुल हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बरसले. सातारा येथे 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भरपावसात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभा घेतली होती. त्या सभेचे स्मरण कालच्या राहुल यांच्या सभेने सर्वांना झाले. कर्नाटकमध्ये राहुल गांधी यांनी काल म्हैसूरमध्ये उपस्थित समुदायाला भरपावसात संबोधित केलं. राहुल गांधी यांच्या सभेचं वैशिष्ट्य म्हणजे भरपावसात त्यांनी संवाद साधला.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : भारताला पुन्हा एकत्र जोडण्यासाठी आणि देशाला मजबूत करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने ७ सप्टेंबर २०२२ पासून भारत जोडो यात्रा सुरू …

पुढे वाचा

Marathi News

Join WhatsApp

Join Now