राहुल गांधी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नाहीत – शरद पवार

RAHUL WITHA SHARAD PAWAR

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या एका विधानामुळे युपीए कडून पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नेमकं कोण असणार याबद्दल चर्चा सुरु झाल्या आहेत. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांना राहुल गांधी महाआघाडीचे पंतप्रधान असतील का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता राहुल यांनीच पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नसल्याचं स्पष्ट केल्याचं पवार यांनी सांगितलं. मीडिया अशा प्रकारचा प्रचार का करत आहे? असा संतप्त सवालही त्यांनी केला.

दरम्यान,जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात मतपेटीतून नाराजी व्यक्त करत काँग्रेसचं नेतृत्व स्वीकारल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र पवारांनी पंतप्रधानपदाबाबत्त केलेल्या या  वक्तव्यामुळे त्यांच्या मनात पंतप्रधान होण्याची आशा अजूनही बाकी आहे का? असा देखील सवाल देखील उपस्थित यानिमित्ताने झाला आहे.