fbpx

राहुल गांधी माझे नेते नाहीत- हार्दिक पटेल

rahul-hardik,rahul gandhi

टीम महाराष्ट्र देशा- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे व्यक्तिगत पातळीवर मला ते आवडतात,त्यांचे राजकारणही मला पटते, त्यांचे विचारही पटतात मात्र ते माझे नेते नाहीत.अशी प्रतिक्रिया पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी दिली आहे. मुंबई आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. फक्त या विधानावर न थांबता प्रियंका गांधी यांची देशाच्या राजकारणात कधी एंट्री होणार याची वाट मी पाहतो आहे असेही पटेल यांनी म्हटले आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये हार्दिक पटेल यांनी राहुल गांधींच्या साथीने भाजपला चांगलंच जेरीला आणलं होतं. मात्र आता मात्र राहुल गांधी यांना मी माझे नेते मानत नाही असं वक्तव्य केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.