fbpx

राहुल गांधी आता माझेही बॉस- सोनिया गांधी

sonia-gandhi-rahul-gandhi

नवी दिल्ली : ‘राहुल गांधींची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे आणि आता ते माझेही बॉस आहेत.’ असे उद्गार काँग्रेसच्या संसदीय समितीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काढले. दिल्लीमध्ये आज (गुरुवार) काँग्रेसच्या संसदीय समितीची बैठक झाली. त्यात सोनिया गांधी बोलत होत्या. सरकारने सुरक्षा यंत्रणांना फक्त विरोधकांना हैराण करण्यासाठीच ठेवलं असल्याचा गंभीर आरोप यावेळी गांधी यांनी केला.

नेमकं काय म्हणाल्या सोनिया गांधी 

‘सरकार सत्तेत येऊन चार वर्ष झाली. पण यादरम्यान सर्व महत्त्वाचं संस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. संसद, न्यायालय, मीडिया इतकंच नाही तर नागरी समाजाला सरकारने सोडलेलं नाही. तर सुरक्षा यंत्रणांना फक्त विरोधकांना हैराण करण्यासाठीच ठेवलं आहे.राहुल गांधींची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे आणि आता ते माझेही बॉस आहेत.’