राहुल गांधी असुरक्षित, स्नायपरनं 7 वेळा गोळ्या झाडण्याचा प्रयत्न

blank

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे लोकसभेच्या प्रचारात व्यस्त आहेत अशातच त्यांच्यावर स्नायपरनं 7 वेळा गोळ्या झाडण्याचा प्रयत्न झाला आहे, असा दावा कॉंग्रेसकडून करण्यात आला आहे.

राहुल गांधी यांच्या जीवाला धोका आहे त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे काँग्रेसने केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहून याबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे. गृहमंत्रालयाकडून त्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

प्रचारादरम्यान राहुल गांधींसह अनेक नेते जनसमुदायात मिसळून त्यांच्याशी संवाद साधतात. त्यावेळी त्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतलेली असते. परंतु कॉंग्रेसने केलेल्या या दाव्यामुळे नेत्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कॉंग्रेसने लिहिलेल्या या पत्रावर गृहमंत्रालय काय कारवाई करणार हे पाहन महत्वाचं ठरणार आहे.