देशाच्या इतिहासातील अविस्मरणीय क्षण; राहुल गांधींची पंतप्रधान मोदींना ‘जादू कि झप्पी’

टीम महाराष्ट्र देशा: देशाच्या इतिहासातील अविस्मरणीय क्षण आज लोकसभेमध्ये पहायला मिळाला आहे. कायम एकमेकांच्या अंगावर धावून जाणारे सत्ताधारी आणि विरोधक आपण कायम पाहतो. मात्र, आज आपल्या भाषणातून सरकारचे वाभाडे काढल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतली.

मोदी सरकार विरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर आज लोकसभेत मतदान केले जाणार आहे, याआधी भाषण करताना राहुल गांधी यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून हल्ला केला. सरकारच्या योजना आणि धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण करत गांधी यांनी कडाडून टीका केली.

काँग्रेस ही एक भावना असून ती भावना तुमच्याही मनात आहे. मी तुम्हाला काँग्रेस बनवेन, असं म्हणत राहुल यांनी भाषण संपवलं, पुढे वेलमधून ते थेट नरेंद्र मोदींच्या खुर्चीकडे गेले आणि यांची गळाभेट घेतली. राहुल गांधी यांनी अचानक केलेल्या या कृतीने नरेंद्र मोदी देखील काही काळासाठी आश्चर्यचकित झाल्याच पहायला मिळाल.

https://youtu.be/HMTToOrbEsU Loading…
Loading...