राहुल गांधी भारतसे घृणा करते है,वोह राहुल गांधी नाही राहुल ‘ लाहोरी ‘ है !

दिल्ली:कॉंग्रेस नेते खासदार शशी थरूर यांनी नुकतेच ‘ लाहोर फेस्ट ‘ नामक एका कार्यक्रमात असे म्हटले की ‘ भारतात जाणीवपूर्वक एक भीतीयुक्त वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय.खासकरून उत्तर आणि पूर्व भारतात खूप भीतीदायक स्थिती निर्माण केली गेली आहे.

‘तब्लीकी जमात’ सारख्या प्रकरणात मुस्लिमांना एका वेगळ्या वेगळ्याच नजरेने दाखवले गेले.यामुळे सामाजिक वातावरणात मुस्लीम समज हा खलनायक म्हणून दाखवला गेला. पण मला हा सगळा एका व्यापक कटाचा भाग वाटत असल्याचे थरूर यांनी म्हटले.यावर भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी कॉंग्रेसवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे.

पात्रा म्हणाले ‘ की भारतातला एका मोठ्या पक्षाचा खासदार असं काही बोलू शकतो यावर मझा विश्वास बसत नाहीये.आणि हे असं का बोलताय यामागे सोनिया गांधी आणि राहुल गांधी याचं समर्थन आहे का ? असेल तर त्यांनी भारतापेक्षा पाकिस्तानात जाऊन निवडणुकीची तयारी करावी.तसेच राहुल गांधी यांना आणि त्यांच्या पक्षाला नेहमीच पाकिस्तानचा कळवळा राहिलंय.राहुल गांधी हे गांधी नसून राहुल लाहोरी असल्याचही त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-