काँग्रेसमध्ये ‘राहुल’पर्वाची सुरुवात

काँग्रसचे 18 वे, गांधी घराण्यातील सहावे अध्यक्ष ;१६ डिसेंबरला राहुल गांधी अध्यक्षपदाचा स्वीकारणार पदभार

नवी दिल्ली: राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे . काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मुल्लापल्ले रामचंद्रन यांनी याबाबतची घोषणा केली.काँग्रेस पक्षाकडून सोमवारी पक्षाचे नवे अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात आली. ४ डिसेंबरला राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र पक्षातून कोणीही विरोधात उमेदवारी अर्ज दाखल न केल्यामुळे राहुल गांधी बिनविरोध निवडण्यात आल्याचं रामचंद्रन यांनी सांगितलं. राहुल गांधी येत्या 16 डिसेंबरला अध्यक्षपदाचा भार स्वीकारतील.

bagdure

काँग्रसचे 18 वे, गांधी घराण्यातील सहावे

दरम्यान, राहुल गांधी हे काँग्रेसचे 18 वे अध्यक्ष ठरले आहेत. तर गांधी घराण्यातील सहावे व्यक्ती आहेत.याआधी मोतीलाल नेहरु, पंडीत जवाहरलाल नेहरु एकदा, इंदिरा गांधी दोन वेळा, राजीव गांधी एक वेळा, सोनिया गांधी एक वेळा काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे.सोनिया गांधी सलग 19 वर्ष काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या, आता ही जबाबदारी राहुल गांधी यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

You might also like
Comments
Loading...