राहुल गांधींना उद्धव ठाकरेंनी खूप तगडं आव्हान दिलं आहे; भाजप नेत्याने उडवली खिल्ली

rahul gandhi

मुंबई : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्चला मांडला जाणार असून 10 मार्चला अधिवेशनाची सांगता होईल. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावर चर्चा करण्याचा अखेरचा दिवस होता. गेले तीन दिवस भाजपने राज्य सरकारवर विविध विषयांवरून हल्लाबोल केला आहे.

भाजपच्या आरोपांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील चोख प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी कोरोना काळातील भ्रष्टाचारापासून ते औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण करण्यापर्यंतच्या अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून देखील भाजपला चांगलच सुनावलं.

मात्र, उद्धव ठाकरेंच्या भाषणावरून आता भाजप नेत्यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी, ‘काँग्रेस नेते राहूल गांधीजी यांना उद्धव ठाकरेंकडून खरच खूप तगडं आव्हान दिलं आहे. एखाद्या दिवशी या दोघांना एकाच वेळी, एकाच स्टेजवर बोलायला लावलं तर हास्याची दंगल होईल. फुल पैसा वसूल !’ असं ट्विट केलं आहे.

मुख्यमंत्र्यांचं भाषण हे चौकातलं भाषण होतं – देवेंद्र फडणवीस

दरम्यान, ‘मुख्यमंत्र्यांचं भाषण हे चौकातलं भाषण होतं. कोरोना संदर्भातील विरोधकांच्या मुद्याला ते उत्तर ते देऊ शकले नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या भाषणानं महाराष्ट्राची निराशा केली. शरजील उस्मानीच्या केसालाही धक्का लावण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारमध्ये नाही.मुख्यमंत्र्यांनी भारतीय सैनिकांचा अपमान केलाय. देशाच्या शूर सैनिकांचा घोर अपमान मुख्यमंत्र्यांनी केला. अमित शाह यांच्याबद्दल जे बोलले ते उसणं आवसान आणून, खोट बोल पण रेटून बोल, असं मुख्यमंत्र्यांच रुप पाहायला मिळालं,’ असा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP