‘राहुल गांधींनी मोदींना रस्ता दाखवला होता ; अहंकाऱ्यांनो, जरा शिका’

nitin raut

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवा संध्याकाळी ५ वाजता जनतेशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी लसीकरणाबाबत महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. २१ जूनपासून १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस मोफत देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

यासोबतच, लसीकरणाची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकार घेत असल्याचे सांगितले.पंतप्रधानांच्या या घोषणेनं स्वागत होत असतानाच काँग्रेससह अन्य विरोधकांनी मोदींवर टीकाही केलीय. काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केलीय. राऊत यांनी एक कार्टुन ट्वीट करुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय.

‘आमचे नेते राहुल गांघी यांनी सुरुवातीलाच रस्ता दाखवला होता. राहुल गांधी कोरोनाच्या सुरुवातीपासूनच सरकारला खबरदार करत होते. तसंच उचित सल्लाही देत होते. अहंकाऱ्यांनो, जरा शिका’, असं ट्वीट करत नितीन राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केलीय. या ट्वीटमध्ये राऊत यांनी एक फोटोही ट्वीट केलाय. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती एक काठी आहे. ही काठी पकडून राहुल गांधी मोदींना मार्ग दाखवत असल्याचं पाहायला मिळतंय. या फोटोत वरच्या कोपऱ्यात राहुल गांधी यांनी केलेल्या ट्वीटचा एक स्क्रिन शॉटही दाखवण्यात आलाय. त्यात लसीची खरेदी केंद्र सरकारने करावी आणि वितर राज्य सरकारांनी. जेणेकरुन गावापर्यंत लस पोहोचेल, असं राहुल गांधी यांनी सूचवलं होतं असं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या निर्णयानंतर आरोग्य मंत्रालय व नीती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांनी केंद्र सरकारच्या लस खरेदीबाबत महत्वपूर्ण माहिती दिली आहे. पॉल यांनी याबाबत बोलताना, ‘केंद्र सरकारतर्फे कोव्हीशील्ड लसीच्या २५ कोटी तर कॅव्हॅक्सिनच्या १९ कोटी डोससाठी सिरम इन्स्टिट्यूट व भारत बायोटेकला ऑर्डर दिली आहे. याव्यतिरिक्त भारत सरकारने बायोलॉजिकल-ई लसीच्या ३० कोटी डोससाठी ऑर्डर दिली आहे, ही लस सप्टेंबरमध्ये उपलब्ध होईल.’ अशी माहिती दिली.

महत्वाच्या बातम्या

IMP