fbpx

मोदी सरकारविरुद्ध वादग्रस्त विधान, राहुल गांधींना पुन्हा एकदा नोटीस

टीम महाराष्ट्र देशा : मोदी सरकारविरुद्ध वादग्रस्त विधान केल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाकडून पुन्हा एकदा नोटीस पाठवण्यात आली आहे. राहुल गांधींनी केंद्रातील मोदी सरकारने आदिवासींना गोळ्या घालण्याचा कायदा केला असल्याचं विधान केले होते. याविषयी भाजपने केलेल्या तक्रारीनंतर त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मध्य प्रदेशातील शहडोल इथं बोलताना राहुल गांधी यांनी ‘मोदींनी असा कायदा केला आहे की, ज्यानुसार आदिवासींना गोळ्या झाडल्या जाऊ शकतात.’ असं विधान केलं होतं. भाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांच्या वक्तव्याने आचार संहितेचं उल्लघन झाले आहे, असं म्हणत त्यांना नोटीस देण्यात पाठवण्यात आली आहे. तसेच ४८ तासांत याबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, यापूर्वीही राहुल गांधींनी राफेल विमान खरेदी प्रकरणात अंबानींच्या कंपनीसोबत करार करण्यात पंतप्रधानांचा पुढाकार होता. हे सर्व करार नियमबाह्य आणि हेतुपूर्वक पद्धतीने केल्याचा आरोप केला होता. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून ‘चौकीदार ही चोर है’ असे वक्तव्य केले होते. त्यावेळीही त्यांना नोटीस देण्यात आली होती. आणि आता पुन्हा एकदा राहुल गांधींना निवडणूक आयोगाने नोटीस पाठविली आहे.