fbpx

गोंधळलेल्या राहुल गांधींनी शपथ घेतली, पण सही करायलाच विसरले

नवी दिल्ली लोकसभेच्या १७ व्या सत्राला संसदेत सोमवारी सुरुवात झाली. मोदी सरकार २ च्या संसदेतील पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह नवनिर्वाचित खासदारांनी शपथ घेतली. पहिल्या सत्रातील या शपथविधी सोहळ्यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सभागृहात उपस्थित नव्हते. मात्र, दुपारच्या सत्रात ते हजर झाले. दुपाराच्या सत्रात राहुल गांधींनी नवनिर्वाचित खासदार म्हणून शपथ घेतली.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील चौथ्यांदा लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. मात्र, ते काहीसे गोंधळलेल्या अवस्थेत दिसले. शपथ घेतल्यानंतर ते नोंदवहीत स्वाक्षरी करायचे विसरले आणि आपल्या जागेवर जाण्यासाठी निघाले. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह इतर काही खासदारांनी त्यांनी स्वाक्षरी करण्याचा इशारा केला. त्यानंतर राहुल गांधी पुन्हा आले आणि त्यांनी स्वाक्षरी केली.