मोदी विरोधी लाटेने राहुल गांधींचे फॉलोअर्स वाढले 

२०१४ साली ज्या सोशल मिडीयाचा वापर भाजपने प्रभावी प्रचारासाठी केला तोच सोशल मिडिया आज भाजप नेत्यांसाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. रोज लाखो युजरकडून भाजपला ट्रोल केल जात आहे. मात्र अशात कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी चांगली बातमी आहे. कारण सध्या असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी लाटेने राहुल गांधींचे फॉलोअर्स दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या दोन महिन्यात राहुल गांधीच्या ट्विटरवरील फॉलोअर्सच्या संख्येत १० लाखांनी वाढ झाली आहे.

ट्विटरवर जुलै २०१७ मध्ये राहुल यांचे फॉलोअर्स साधारण २४.९३ लाख पर्यंत होते. यात वाढ होवून आता सप्टेंबरमध्ये हि संख्या ३४ लाखांपर्यंत वाढली आहे. राहुल यांच्या फॉलोअर्सची संख्या वाढली असली तरी ते पंतप्रधान मोदींच्या खूप मागे आहेत. ट्विटरवर पंतप्रधान मोदींचे २.१ कोटी फॉलोअर्स आहेत.