राहुल गांधी थेट घुसले महिला स्वच्छतागृहात

rahul-gandhi-enterd in ladies tiolet

टीम महाराष्ट्र देशा: कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे सध्या गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. गुजरातमधील सभांमध्ये राहुल गांधी हे पंतप्रधान मोदींवर कडाडून टीका करत आहेत. थेट गुजराती भाषेतून प्रश्न विचारत गांधी यांनी मोदींवर निशाना साधल्याच पहायला मिळत आहे. मात्र तीच गुजराती भाषा न समजल्याने राहुल गांधी यांच्यासोबत एक विचित्र घटना घडली आहे. झाल असं कि, राहुल गांधी छोटा उदयपूरमधील कार्यक्रमानंतर सभागृहातून बाहेर पडले आणि थेट महिला स्वच्छतागृहात गेले. दरम्यान  महिला आणि पुरुषांसाठी उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहांबाहेर कोणतीही स्पष्ट खूण नसल्याने हा प्रकार घडला.

प्राथमिक माहितीनुसार संबंधित महिला स्वच्छतागृहाबाहेर केवळ गुजराती भाषेत ‘महिला माटे शौचालय’ असे लिहिण्यात आले होते. तसेच त्यावर कोणत्याही प्रकारची खून नव्हती. दरम्यान चूक लक्षात आल्यानंतर राहुल गांधी लगेच स्वच्छतागृबाहेर आले. मात्र तो पर्यंत स्वच्छतागृबाहेर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणत गर्दी केली होती. हा संपूर्ण प्रकार प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाला.Loading…
Loading...