पंतप्रधानपदाची स्वप्न पाहणाऱ्या राहुल गांधींना व्यसनमुक्ती केंद्रात जाण्याची गरज    

नवी दिल्ली : शिरोमणी अकाली दलाचे दिल्लीतील राजौरी गार्डन पश्चिम या विधानसभा मतदारसंघातील आमदार मनजिंदर सिंग सिरसा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी व्यसनी असून पंतप्रधान होण्याची त्यांची लायकी नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ ट्विट करत त्यांनी राहुल गांधी यांच्यावर थेट निशाणा साधला.

मनजिंदर सिंग यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये राहुल गांधी विमानतळावर रांगेत उभे असल्याचं दिसत आहे. ‘पंजाबमधील ७० टक्के तरुणांना अमली पदार्थांचं व्यसन आहे असं म्हणणारा व्यक्तीच आज व्यसनी दिसत आहे’, असं कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिलं आहे. राहुल गांधी यांचा चेहरा पंतप्रधानपदासाठी लायक नसून त्यांनी तर आधी व्यसनमुक्ती केंद्रात जायला हवं, असंही ते  यावेळी म्हणाले. दरम्यान आता  मनजिंदर सिंग सिरसा  यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे.