fbpx

मोदी माझ्या डोळ्यात डोळे घालून बघू शकत नाहीत ;राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

टीम महाराष्ट्र देशा- केंद्रातील मोदी सरकारविरोधात संसदेत आज अविश्वास ठरावावर मतदान होणार असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी पहायला मिळत आहे. आज कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. तुम्ही रोजगाराच्या नावाने भजी तळण्याचा सल्ला दिला असं म्हणत राहुल गांधीचं मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. जीएसटीने हे भाजपाचे राजकीय अस्त्र असल्याचा देखील आरोप गांधी यांनी केला.मी पंतप्रधानांवर आरोप केलेत, पंतप्रधान मोदी माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नाहीत असं देखील ते म्हणाले.

– अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
-चीन 24 तासात 50 हजार युवकांना रोजगार देतो, मात्र तुम्ही (मोदी सरकार) 24 तासात अवघ्या 400 युवकांना रोजगार देता : राहुल गांधी
-देशातील जनता जुमलेबाजीने पीडित, राहुल गांधींचा हल्लाबोल
जुमला नं. 1) प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख
जुमला नं. 2) 2 कोटी युवकांना रोजगार
-नोटाबंदी हा मोदींचा सर्वात मोठा विनोद, जीएसटीने कोट्यवधींना लुबाडलं, बड्या साठी मोदी काम करतात, शेतकरी, बेरोजगार, तरुणांची पदरी केवळ भूलथापा – राहुल गांधी
-पंतप्रधान नरेंद्र मोदी चौकीदार नव्हे तर भागीदार आहेत : राहुल गांधी
-पंतप्रधानांनी एखाद्या जादूप्रमाणे राफेल कराराची किंमत वाढवली, 520 कोटींचं विमान 1600 कोटींना खरेदी केलं, संरक्षणमंत्रीही खोटं बोलल्या : राहुल गांधी
मोदी गुजरातेत चीनच्या राष्ट्रपतींसोबत झोके घेत होते, त्यावेळी सीमेवर चीनचं सैन्य घुसलं होते : राहुल गांधी.

शेतकऱ्यांना उत्पन्न दूप्पट करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे शासनाचे प्रयत्न-महादेव जानकर

अविश्वास प्रस्ताव : सेना-भाजपचे ‘हम साथ साथ है’!