खोटं ऐकून ऐकून विकास वेडा झालाय: राहुल गांधी

rahul gadhi

खेडा (गुजरात) : गुजरातमधील खेडामध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला . 22 वर्षांपासून गुजरातमध्ये कामगार, महिला, लहान दुकानदार यांना जे बोलायचं आहे, ते कुणीही ऐकत नाही. “नरेंद्र मोदींनी कुणाचंही न ऐकता रात्री 12 वाजता जीएसटी लागू केलं. आम्ही सांगितलं की, 18 टक्क्यांहून अधिक कर लावू नका, कारण अशामुळे  छोट्या  व्यापाऱ्यांना फटका बसेल. भाजपने ना लोकांचं ऐकलं, ना आमचं ऐकलं. अचानकपणे जीएसटी लागू केलं. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.खोटं ऐकून ऐकून विकास वेडा झालाय, असं म्हणत राहुल गांधींनी मोदींची खिल्ली उडवली .

काय म्हणाले राहुल गांधी ?

जीएसटीची कल्पना काँग्रेस पक्षाची होती. संपूर्ण देशात एकच कर प्रणाली असावी, असं आम्हाला वाटत होतं. आम्ही लोकांपर्यंत आलो. लोकांना विचारलं, त्यानंतर लोकांनी सांगितलं, देशात एकच कर प्रणाली असावी. शिवाय, 18 टक्क्यांपेक्षा जास्त कर न लावण्याचेही लोकांनी सूचवलं. आमच्या जीएसटीच्या कल्पनेत या गोष्टी होत्या. शिवाय, जीएसटी भरण्यासाठी एकच फॉर्म होता. आमचं जीएसटी असं होतं. विकासाचं कोणतंही काम इतरांचं ऐकल्याशिवाय होऊ शकत नाही. काँग्रेस पक्ष कोणतंही काम करण्याआधी लोकांशी चर्चा करतं. मात्र गेल्या 22 वर्षांपासून गुजरातमध्ये कामगार, महिला, लहान दुकानदार यांना जे बोलायचं आहे, ते कुणीही ऐकत नाही. “नरेंद्र मोदींनी कुणाचंही न ऐकता रात्री 12 वाजता जीएसटी लागू केलं. आम्ही सांगितलं की, 18 टक्क्यांहून अधिक कर लावू नका, कारण अशामुळे लहान-सहान व्यापाऱ्यांना फटका बसेल. भाजपने ना लोकांचं ऐकलं, ना आमचं ऐकलं. अचानकपणे जीएसटी लागू केलं. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.”, असे राहुल गांधी म्हणाले